अणुरेणिया थोकडा
अणुरेणियां थोकडा ।
तुका आकाशाएवढा ॥१॥
गिळुन सांडिलें कलेवर ।
भव भ्रमाचा आकार ॥२॥
सांडिली त्रिपुटी ।
दीप उजळला घटीं ॥३॥
तुका ह्मणे आतां ।
उरलो उपकारापुरता ॥४॥
तुका आकाशाएवढा ॥१॥
गिळुन सांडिलें कलेवर ।
भव भ्रमाचा आकार ॥२॥
सांडिली त्रिपुटी ।
दीप उजळला घटीं ॥३॥
तुका ह्मणे आतां ।
उरलो उपकारापुरता ॥४॥
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | राम फाटक |
स्वर | - | पं. भीमसेन जोशी |
राग | - | मालकंस |
गीत प्रकार | - | संतवाणी |
कलेवर | - | शरीर. |
थोकडा | - | लहान. |
भावार्थ
तुकाराम महाराज स्वतःच्या व्यापक जाणिवेबद्दल या अभंगात पुढीलप्रमाणे वर्णन करतात, "मी अणुरेणूपेक्षा सूक्ष्म असून आकाशाएवढा मोठाही आहे. मी भ्रमजन्य देहादी प्रपंचरूपी सर्व आकार गिळून टाकला आहे. तो मला बाधत नाही. ज्ञेय, ज्ञाता व ज्ञान इत्यादी त्रिपुटी मी सांडली आहे आणि देहरूपी घटाच्या ठिकाणी निजबोधरूपी दीप प्रकाशित केला आहे. आता केवळ लोकांवर उपकार करण्यासाठी उरलेले आयुष्य घालवीत आहे.
डॉ. प्रा. जे. बी. शिंदे
देवमुक्त, धर्ममुक्त तुकारामांची गाथा
सौजन्य- स्वरूप प्रकाशन, पुणे-कोल्हापूर.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.