A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ज्ञानियांचा राजा

ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ।
ह्मणती ज्ञानदेव तुह्मां ऐसें ॥१॥

मज पामरासीं काय थोरपण ।
पायींची वाहाण पायीं बरी ॥२॥

ब्रह्मादिक जेथें तुह्मां वोळगणे ।
इतर तुळणें काय पुढे ॥३॥

तुका ह्मणे नेणे युक्तीचिया खोलीं ।
ह्मणोनि ठेविली पायीं डोई ॥४॥
गीत - संत तुकाराम
संगीत - राम फाटक
स्वराविष्कार- पं. भीमसेन जोशी
रवींद्र साठे, केशव बडगे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - संतवाणी
  
टीप -
• स्वर- पं. भीमसेन जोशी, संगीत- राम फाटक.
• स्वर- रवींद्र साठे, केशव बडगे, संगीत- भास्कर चंदावरकर, चित्रपट- आक्रीत (१९८१).
वोळगणे - सेवा करणे / शरण येणे.
भावार्थ-

  • तुम्ही ज्ञानी माणासांचे गुरू महाराज आहात म्हणून तुम्हाला ज्ञानदेव म्हणतात.
  • मला गरिबाला मोठेपण कशास देता? पायांतली वहाण पायांतच बरी.
  • ब्रह्मादिक देव जेथे तुमच्या ज्ञानापुढे शरण जातात, कौतुक करतात, तेथे इतरांच्या तुलना काय पुर्‍या पडणार !
  • तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानाची किंवा वागणुकीची तशी खोली मला माहिती नाही आणि म्हणूनच मी तुमच्या पायावर डोके ठेवले आहे.

गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  पं. भीमसेन जोशी
  रवींद्र साठे, केशव बडगे