लागली समाधी, ज्ञानेशाची
ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव
नाचती वैष्णव, मागेपुढे
मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड कैवल्याचे
उजेडी राहिले उजेड होऊन
निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | पु. ल. देशपांडे |
स्वर | - | पं. भीमसेन जोशी |
चित्रपट | - | गुळाचा गणपति |
राग | - | भीमपलास |
गीत प्रकार | - | भक्तीगीत, चित्रगीत |
राणीव | - | राज्य / ऐश्वर्य / अधिकार. |
वैष्णव | - | विष्णुभक्त. |
तेव्हा पु.ल. गायक होण्याच्यामागे लागले होते. महाराष्ट्रभर फिरुन ते भावगीत गायनाचे कार्यक्रम करत असत. कोल्हापूरच्या सोळंकूरकर मास्तरांचा संगीत मेळा त्याकाळात खूप प्रसिध्द होता. मेळ्यात तेव्हा गाणार्या गुणवान मुलांची नावे होती सुधीर फडके, राम गबाले, आप्पासाहेब भोगावकर.
मुंबईत संगीतक्षेत्रात धडपडणारे पण कोल्हापूरला या मुलांसमोर भेट देताना ज्यांची.. 'मुंबईचे नामवंत भावगीत गायक' अशी ओळख करुन दिली जात असे, ते पु.ल.देशपांडे, या मेळ्याला नामवंत पाहुणे म्हणून भेट देत असत ! गदिमांची अनेक गीते त्यांना तिथे मिळत असत व त्यांना चाली लावून ते कार्यक्रम करत असत. यातूनच पुढे दोघांची भेट झाली व दोघांत स्नेह निर्माण झाला.
'गुळाचा गणपति' हा चित्रपट 'सबकुछ पु.ल.' अशा नावाने जरी ओळखला जात असला तरी यात गीते होती, अर्थातच गदिमांची. 'इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची' हा अभंग याच चित्रपटातला. हा गाणार्या पं.भीमसेन जोशींना सुध्दा माहित नव्हते की हे गीत गदिमांचे आहे. अगदी एच.एम.व्ही. कंपनीच्या रेकॉर्डवर त्या काळात, 'एक पारंपरीक अभंग' अशा नावाने तो प्रसिध्द झाला होता.
शेवटी गदिमांना सांगावे लागले, "अहो, हे माझे चित्रपट गीत आहे !"
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.