जय सुभाष जय सुभाष
क़दम कदम बढ़ाए जा
ख़ुशी के गीत गाए जा ये
जिंदगी है क़ौम की तू
क़ौम पे लुटाए जा
जय सुभाष, जय सुभाष, मंत्र हाच आजला
घोष हाच गाजला
भारतात दश दिशांत नाद हा निनादला
जय हिंद । चलो दिल्ली
होउनी फकीर ध्येयमंदिरात रंगला
ना जुमानिलेत तुंग पर्वतां नि जंगलां
धन्य सैन्य ते- आशेवर जगणारे । वार्यावर तगणारे
शांत ना कधी । श्रांत ना कधी
भारती । आरती । म्हणुनि गाउ या चला
मंत्र हाच आजला
घोष हाच गाजला
भारतात दश दिशांत नाद हा निनादला
जय हिंद । चलो दिल्ली
भारतात ठायि ठायि व्यक्ति व्यक्ति पेटली
बेचाळिस क्रांतिलागि दिव्य शक्ति भेटली
धन्य नृपति तू- देश नसो वेष नसो । दंड नसो कोष नसो
शांत ना कधी । श्रांत ना कधी
रक्त द्या । मुक्त व्हा । हेच ठाउके तुला
मंत्र हाच आजला
घोष हाच गाजला
भारतात दश दिशांत नाद हा निनादला
जय हिंद । चलो दिल्ली
ख़ुशी के गीत गाए जा ये
जिंदगी है क़ौम की तू
क़ौम पे लुटाए जा
जय सुभाष, जय सुभाष, मंत्र हाच आजला
घोष हाच गाजला
भारतात दश दिशांत नाद हा निनादला
जय हिंद । चलो दिल्ली
होउनी फकीर ध्येयमंदिरात रंगला
ना जुमानिलेत तुंग पर्वतां नि जंगलां
धन्य सैन्य ते- आशेवर जगणारे । वार्यावर तगणारे
शांत ना कधी । श्रांत ना कधी
भारती । आरती । म्हणुनि गाउ या चला
मंत्र हाच आजला
घोष हाच गाजला
भारतात दश दिशांत नाद हा निनादला
जय हिंद । चलो दिल्ली
भारतात ठायि ठायि व्यक्ति व्यक्ति पेटली
बेचाळिस क्रांतिलागि दिव्य शक्ति भेटली
धन्य नृपति तू- देश नसो वेष नसो । दंड नसो कोष नसो
शांत ना कधी । श्रांत ना कधी
रक्त द्या । मुक्त व्हा । हेच ठाउके तुला
मंत्र हाच आजला
घोष हाच गाजला
भारतात दश दिशांत नाद हा निनादला
जय हिंद । चलो दिल्ली
गीत | - | वसंत बापट |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | श्रीकांत पारगांवकर, त्यागराज खाडीलकर, आकाशवाणी गायकवृंद |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
तुंग | - | उंच. |
नृप, नृपति, नृपाळ(ल) | - | राजा. |
श्रांत | - | थकलेला, भागलेला. |
पृथक्
क़दम कदम बढ़ाए जा
ख़ुशी के गीत गाए जा ये
जिंदगी है क़ौम की तू
क़ौम पे लुटाए जा
- वंशीधर शुक्ल
हे पद नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय सेनेचे संचलन गीत होते.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.