जीव आज सुना । माना ॥
निज कन्यका मज मानिलें ।
उतराई कैसें व्हावें । शतजन्म अपुरे माना ॥
| गीत | - | वसंत शांताराम देसाई |
| संगीत | - | मास्टर कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन |
| स्वर | - | मास्टर कृष्णराव |
| नाटक | - | विधिलिखित |
| राग / आधार राग | - | कर्नाटकी तोडी |
| ताल | - | त्रिताल |
| चाल | - | पतितपावना |
| गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
संगीत विधिलिखित हे श्री.वसंत शांताराम देसाई यांनी लिहिलेले नाटक ६ एप्रिल १९२८ या दिवशी गंधर्व नाटक मंडळी, पुणे या आघाडीच्या नाट्यसंस्थेतर्फे मराठी संगीत रंगभूमीवर सादर करण्यात आले. या नाटकाचे संगीतकार मास्टर कृष्णराव उर्फ मास्तर.
१९२३ ते १९३३ पर्यंत गंधर्व नाटक मंडळीतर्फे रंगभूमीवर आलेल्या सात नाटकांतील पदांच्या सर्व चाली मास्टर कृष्णरावांनी दिल्या होत्या. मात्र ‘विधिलिखित (१९२८)’ व ‘कान्होपात्रा (१९३१)’ या नाटकांमध्ये विनायकबुवा पटवर्धनांनी भूमिका केली होती आणि प्रमुख संगीतकार मास्टर कृष्णराव होते तरीही स्वत:च्या भूमिकेतील पदांना विनायकबुवांनी चाली दिलेल्या होत्या. त्यामुळे या नाटकांचे मूळ संगीतकार मा.कृष्णराव असले तरी त्यांच्या जोडीला विनायकबुवांचे नाव लिहिले जाते.
(संपादित)
प्रिया फुलंब्रीकर
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












इतर संदर्भ लेख