हरित प्रबल पापभार दशावतार वरिले ।
तेहि काय वांया? ॥
सुबल वरि अबलताच माना ।
प्राप्त अभय तिज नित्य भूतलीं ।
असुरदमन छळितां तिला स्वपद नाश वरिला ।
सार्थ सार्थ माया ॥
गीत | - | वसंत शांताराम देसाई |
संगीत | - | मास्टर कृष्णराव |
स्वर | - | मास्टर कृष्णराव |
नाटक | - | विधिलिखित |
राग | - | गरुडध्वनी |
ताल | - | त्रिवट |
चाल | - | शरण पदा |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
दमन | - | खोड मोडणे, जिरवणे. |
नाटकाची सजावट श्रवणमनोहर संगीत आणि नयनमनोहर दृश्यांच्या द्वारे करितांना श्री. बालगंधर्व यांनी जे परिश्रम घेतले, त्यांचे वर्णन 'हौसेला मोल नाही' याशिवाय दुसर्या कोणत्या शब्दांनीं करणार ! तरी त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. नाटकाचे रंगभूमीवर, पात्रांचे करवीं यथायोग्य दिग्दर्शन करविण्यांत माझे मित्र श्री. गणपतराव बोडस यांनी जी अविश्रांत खटपट केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
त्याचप्रमाणे या नाटकाच्या संगीताची सजावट करण्याचे काम मला गायनाचार्य कै. भास्करबुवा यांचे पट्टशिष्य रा. कृष्णराव फुलंब्रीकर (मास्टर कृष्णराव) यांचे प्रमुख करून आणि पंडित विष्णु दिगंबर पलुसकर यांचे पट्टशिष्य रा. विनायकराव पटवर्धन यांचीही मला फार मदत झाली, त्याबद्दल उभयतांचे आभार मानणे अवश्य आहे. तद्वत्च या नाटकाच्या बाबतींत गंधर्व नाटकमंडळीतील नटवर्ग व माझे इतर स्नेही यांनी जी निरपेक्षपणाने मदत केली, त्याबद्दल त्या सर्वाचे आभार मानणें अवश्य आहे.
श्री. बालगंधर्व यांच्या रंगभूमीवरील नाट्याभिनयाचे कौतुक करायला प्रेक्षकवर्ग केव्हांही तयारच आहे. त्या कौतुकाचे माप माझ्या देखील पदरांत पडल्याशिवाय कसे राहील? परंतु, माझ्या प्रथम कृतीच्या प्रसंगी मी रसिकांच्या न्यायनिष्ठुर चिकित्सेपेक्षा थोर सहृदयतेवरच सर्वस्वी अवलंबून आहे, हें नम्रपणे सुचवून हा प्रस्तावनालेख पुरा करतो.
(संपादित)
वसंत शांताराम देसाई
दि. ६ एप्रिल १९२८
'संगीत विधिलिखित' या नाटकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- गणेश प्रिंटिंग वर्क्स, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.