कमल-नयन हास्य-वदन हांसे ॥१॥
कृष्णा हाल कां रे कृष्णा डोल कां रे ।
घडिये घडिये घडिये गुज बोल कां रे ॥२॥
उभा राहोनियां कैसा हालवितो बाहो ।
बाप रखुमादेविवरु विठ्ठलु नाहो ॥३॥
गीत | - | संत ज्ञानेश्वर |
संगीत | - | |
स्वर | - | मास्टर कृष्णराव |
गीत प्रकार | - | विठ्ठल विठ्ठल, संतवाणी |
गुज | - | गुप्त गोष्ट, कानगोष्ट. |
नाहो | - | नाथ. |
निडळ | - | कपाळ, भालप्रदेश. |
देवा ! कोटी कोटी चंद्रांची सौम्य प्रेममय कांती तुझ्या भालप्रदेशावर मी पाहत आहे. तुझे ते प्रसन्नतेने हसणारे मुख, तुझे ते निर्लिप्त निर्मळ नेत्र माझ्या समोरून कधीच दूर होत नाहीत. पण तरी तेवढ्याने माझे समाधान होत नाही. आता तुझी हालचाल पहावयाची आहे. क्षणोक्षणीं तू माझ्याशी गुजगोष्टी बोलत आहेस, असे मला हवे आहे. चिंतन-कालीन दर्शन पुरेसे नाही. सक्रिय आणि बोलणारे दर्शन हवे आहे.
इतके म्हणताच ज्ञानदेवांचे कोड पुरविणारा श्रीकृष्ण आपला हात हालवू लागला !
आचार्य विनोबा भावे
'ज्ञानेश्वरांची भजनें' या आचार्य विनोबा भावे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- परंधाम प्रकाशन, वर्धा.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.