A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म

सांवळें सुंदर रूप मनोहर ।
राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥

आणीक कांहीं इच्छा आह्मां नाहीं चाड ।
तुझें नाम गोड पांडुरंगे ॥२॥

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ॥३॥

अइका जी तुह्मी भक्त भागवत ।
कराल तें हित सत्य करा ॥४॥

कोणाही जिवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥५॥

तुका ह्मणे एका देहाचे अवयव ।
सुखदुःख जीव भोग पावे ॥६॥
गीत - संत तुकाराम
संगीत - शांक-नील
स्वराविष्कार- पं. जितेंद्र अभिषेकी
बालगंधर्व
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - संतवाणी
  
टीप -
• स्वर- पं. जितेंद्र अभिषेकी, संगीत- शांक-नील
• स्वर- बालगंधर्व, संगीत- ???.
चाड - शरम.
वर्म - दोष, उणेपणा / खूण.
वैष्णव - विष्णुभक्त.
पृथक्‌

(१)
इथे तुकारामांच्या दोन स्वतंत्र रचना एकत्र केल्या आहेत.
त्या अशा-

सावळें सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयीं माझे॥1॥
आणीक कांहीं इच्छा आह्मां नाहीं चाड । तुझें नाम गोड पांडुरंगे ॥ध्रु.॥
जन्मोजन्मीं ऐसें मागितलें तुज । आह्मांसी सहज द्यावें आतां ॥2॥
तुका ह्मणे तुज ऐसे दयाळ । धुंडितां सकळ नाहीं आह्मां ॥3॥

(२)
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥1॥
अइका जी तुह्मी भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥
कोणा ही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥2॥
तुका ह्मणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥3॥

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  पं. जितेंद्र अभिषेकी
  बालगंधर्व