राउळीची घांट निनादली
उठला हुंदका देहूच्या वार्यात
तुका समाधीत चाळवला
अनाथांचा नाथ सोडुनी पार्थिव
निघाला वैष्णव वैकुंठासी
संतमाळेतील मणी शेवटला
आज ओघळला, एकाएकी
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | पं. भीमसेन जोशी |
चित्रपट | - | देवकीनंदन गोपाला |
राग | - | भैरवी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
घांट | - | घंटा. |
राऊळ | - | देऊळ. |
वैष्णव | - | विष्णुभक्त. |
गदिमांच्या अकाली निधनानंतर पुण्याच्या शनिवारवाड्यासमोर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक शोकसभा भरली होती. जमावाला संगीतकार राम कदम यांनी त्यावेळच्या त्यांच्या आगामी 'देवकीनंदन गोपाळा' चित्रपटातील गदिमांचे 'विठ्ठलाच्या पायी' ऐकवले तेव्हा शोकसागराला अधिकच भरती आली होती, ते आजही लख्ख आठवते.
'विठ्ठलाचे पाय धरोनिया राहे । मग संसार तो काय करील तुझे ? ।' हा नामदेवांचा उपदेशपर अभंग तर सर्वश्रुत आहे. 'विठ्ठलपायी' या नावाचा एक मराठी संतपटही निघाला होता आणि त्याला पु. ल. देशपांड्यांनी संगीत दिले होते.
मात्र 'विठ्ठलाच्या पायी' म्हटल्यावर मात्र आपल्या ओठांवर येतात त्या गदिमा गीताच्या ओळी-
विठ्ठलाच्या पायी थरारली वीट
राउळीची घांट निनादली
(संपादित)
गंगाधर महाम्बरे
'भावगीतकार ज्ञानेश्वर' या गंगाधर महाम्बरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- सुदिन ग्रंथ प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.