प्रमोद रानडे

मूलत: व्हायोलीन वादक असलेल्या श्री. प्रमोद रानडे यांनी गायक, वादक, संगीत संयोजक, संगीत अध्यापक, तंत्र सहाय्य.. असा संगीत क्षेत्रात बहु आयामी प्रवास केला आहे.
'मंतरलेल्या चैत्रबनात', 'स्मरणयात्रा', 'निरांजनातील वात' अशा कार्यक्रमातून रंगमंचीय सहभाग..
अल्फा मराठीच्या ’सूर-ताल’ व ई टी.व्हीच्या 'जीवनगाणे'साठी गायक, वादक आणि संगीत संयोजक असा तिहेरी सहभाग.
कवी सुधीर मोघे यांच्या 'कविता पानोपानी' या कार्यक्रमात देशात -परदेशात सहभाग.
’सुवर्ण संगीत’, ’जीवनगाणे’, ’गीतरामायण’ अशा अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण.